वेठबिगार दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 8 : शासनाच्या निर्णयानुसार जिहास्तरीय आणि उपविभागस्तरीय वेठबिगार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
या समितीवरील दोन सामाजिक कार्यकर्त्यांची सदस्यपदी नियुक्ती पालकमंत्री यांच्या संमतीने करावयाची आहे. तसेच जिल्ह्यातील उपविभागीय स्तरावरील समितीवरील सदस्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक अनूसुचित जाती, जमाती, इतर मागासवर्गातील समाजिक कार्यकत्यांनी त्यांचे अर्ज सरकारी कामगार अधिकारी याचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे दि. 23 सप्टेंबर पर्यंत सादर करावे, अर्जासोबत बायोडाटा, दोन पासपोर्ट, सामाजिक संस्थेमध्ये केलेल्या कार्यासह संस्थेचे शिफारसपत्र, जन्मतारखेचा दाखला, जातीचा दाखला, चारित्र्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, शिक्षणाबाबतच्या गुणपत्रिकांची झेरॉक्स सोबत जोडावी, लागणार आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये नियुक्तीकरीता अर्जदार हा यवतमाळ जिल्ह्यातील रविाहसी असावा, तसेच उपविभागीय समितीमध्ये त्या उपविभागातील रहिवासी अणे आवश्यक आहे, असे सरकारी कामगार अधिकारी रा. दे. गुल्हाने यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी