तायक्वाँदो क्रीडा स्पर्धांच्या तारखेत बदल
यवतमाळ, दि.7 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय तायक्वाँदो क्रीडा स्पर्धा 2016-17 चे आयोजन दिनांक 22 आणि 23 सप्टेंबर या दिवशी निश्चित करण्यात आले होते. परंतु राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा दि.22ते 25 सप्टेंबर दरम्यान रायगड अलिबाग येथे करण्यात येत आहे.त्यामुळे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 14 सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे.त्यानुसार सर्व स्पर्धक, खेळाडू तसेच विद्यालय आणि महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती