फटाका परवान्यासाठी 60 दिवस अगोदर अर्ज करावेत
यवतमाळ, दि. 2 : दिवाळी सणासाठी देण्यात येणारा तात्पुरता फटाका परवाना मिळण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी 60 दिवसाअगोदर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
परवाना मिळविण्यासाठी लागणारे कागदपत्रे माहिती नसल्याने किंवा अर्ज उशिरा केल्यामुळे नागरीकांना परवाना विलंबाने मिळतो. त्यामुळे फटाका विक्रेत्यांची गैरसोय होते. त्यामुळे नागरीकांना परवाना वेळेत मिळावा, यासाठी नागरीकांनी विहित नमुन्यातील अर्ज एलई-5 आवश्यक त्या कागदपत्रांसह कार्यालयात 60 दिवस आधी सादर करावा. तसेच यापूर्वी ज्यांनी कार्यालयातून दिवाळी सणासाठी तात्पुरता फटाका परवाना काढला असेल त्यांनी संबंधित ग्रामपंचायत, नगर पालिका तसेच संबंधित पोलिस ठाण्याचा अर्जदाराचे चारित्र्याबाबतचा पडताळणी अहवाल या कार्यालयास सादर करावा, यामुळे नागरीकांना परवाना वेळेत मिळण्यास मदत होईल, असे जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल