सार्वजनिक ग्रंथालयाबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा
यवतमाळ, दि. 23 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे सार्वजनिक ग्रंथालयाबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा गुरूवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अर्थसहाय्ययोजनेतुन ग्रंथालयासाठी राबविण्यात येणाऱ्या समान व असमान अर्थसहाय्यांच्या विविध योजना आणि ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची सार्वजनिक ग्रंथालयांना माहिती यात देण्यात येणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. ग्रंथालय संचालक किरण धांडोरे अध्यक्षस्थानी राहतील प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती भोंडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान पश्चिम विभाग क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रा. रा. राऊत, प्रमुख कार्यवाह विनोद देशपांडे औरंगाबाद येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदी उपस्थित राहतील.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. या कार्यशळेत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले ग्रंथालय अधिक लोकाभिमुख करून सुसज्ज करावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी