जिल्ह्यात घरोघरी जाऊन कुष्ठरोगाची तपासणी
* 19 सप्टेंबरपासून सुरूवात
* 14 दिवस चालणार मोहिम
*साडेपाच लाख घरांना भेटी
यवतमाळ, दि. 15 : गेल्या एप्रिलपासून जिल्ह्यात कुष्ठरोगाचे केवळ 25 रूग्ण नव्याने आढळून आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. कुष्ठरोग हा उपचाराने बरा होत असल्यामुळे कुष्ठरोगाची लागण झालेले व्यक्ती आणि त्यांच्याशी संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान कुष्ठरोगाची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यात साडेपाच लाख घरांना भेटी देण्यात येणार असून यात साडेपाच हजार कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
जिल्ह्यात 231 रूग्ण आढळून आले आहेत. यातील 39 रूग्ण औषधोपचारामुळे पुर्णपणे बरे झाले आहेत. यातील 165 रूग्णांवर विविध उपचार सुरू आहे. जिल्ह्यात 21 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान राबविलेल्या कुष्ठरोग मोहिमेतील सर्व्हेक्षणादरम्यान 13 तालुक्यातील 16 लाख 66 हजार नागरीकांची आशा आणि स्वयंसेवकांनी घरी जाऊन तपासणी केली. यात एक हजार 415 संशयीत रूग्ण आढळून आले. यातील एक हजार 222 नागरीकांची तपासणी करण्यात आली. यात 13 नागरीक मल्टी बॅसिलरी तर 12 नागरीक पॉसी बॅसिलरी कुष्ठरोगाचे रूग्ण आढळून आले. यातील पॉसी बॅसिलरी कुष्ठरोग हा केवळ सहा महिन्याच्या औषधोपचाराने पूर्ण होतो, तर मल्टी बॅसिलरी कुष्ठरोग 12 महिन्यांच्या बहुविध औषधोपचाराने पूर्ण होतो. प्रभावी औषधोचाराचा यात वापर करण्यात येत असल्यामुळे ही औषधे नियमित आणि पूर्ण कालावधीसाठी घेणे आवश्यक आहे.
ही कुष्ठरोग मोहिम 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान शहरी आणि ग्रामीण भागात एकाचवेळी राबविण्यात येणार आहे. यात सर्व घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून सर्व सभासदांची तपासणी करण्यात येणार आहे. यात पाच हजार 576 कर्मचाऱ्यांकडून 5 लाख 65 हजार 720 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाचे रूग्ण तपासणीसाठी घरोघरी जाऊनच तपासणी हा एकमेव योग्य पद्धत असल्यामुळे यावर प्रभावीपणे काम करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान आढळलेल्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनाही खबरदारी म्हणून औषधोपचार करण्यात येणार आहे. मोहिमेत आढलेल्या रूग्णांची वैद्यकीय अधिकारी यांच्यातर्फे तपासणी करून तो कुष्ठरोग असल्याची खात्री झाल्यानंतर औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे. कुष्ठरोग झालेल्या रूग्णांना 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आल्यास त्यांना अपंगांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सवलती मिळणार आहे. त्यासोबतच अमरावती जिल्ह्यातील कोठारा येथील रूग्णालयात शस्त्रक्रियेचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. भगत, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी जया राऊत आदी उपस्थित होते.
शहरी भागातील सर्व्हेक्षणाचे नियोजन करावे – दिपक सिंगला
            कुष्ठरोग शोध मोहिम ही ग्रामीण भागात प्रामुख्याने राबविल्या गेली. जिल्ह्यातील सुमारे सात लाख लोकसंख्या शहरी आहे. आता ही मोहिम शहरी भागातही राबविण्यात येत आहे, जिल्हा आरोग्य यंत्रणेचे शहरी भागात सर्व्हेक्षणासाठी आशा, स्वयंसेवक किंवा यंत्रणा नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी नगरपालिका आणि शहरातील नर्सिंग महाविद्यालयांशी समन्वय साधून शहरी भागातील जास्तीत जास्त नागरीकांची तपासणी करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश श्री. सिंगला यांनी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी