24 रेतीघाटांच्या लिलावासाठी ई-निविदा
यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यातील 24 रेतीघाटाचा ई-टेंडरींगद्वारे लिलाव करण्यात येणार आहे. लिलावासाठी इच्छुक कंत्राटदारांनी ई-निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन  करण्यात आले आहे.
            घाटांच्या लिलावाकरीता सविस्तर माहिती eauctioncollyat.abcprocure.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दिनांक 23 सप्टेंबर पासून बिडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने भरणे बंद होईल. दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरू होईल. दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने भरणे बंद होईल. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उघडण्यात येतील. त्याच दिवशी ई-लिलाव करण्यात येतील.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल