जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहिम
यवतमाळ, दि.7 :प्रधानमंत्री प्रगती योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये आशा, पुरूष स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन कुष्ठरोग विषयक माहिती देऊन कुटुंबातील सव सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणात आढळलेल्या सर्व संशयित रूग्णांची तपासणी सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.कुष्ठरोग विषयक जनजागृती करून समाजातील कुष्ठरोग तातडीने शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणण्यासाठी ही मोहिम पल्स पोलिओ अभियानाप्रमाणे राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आल्या आहे.या समित्यांच्या माध्यमातून ही मोहिम कालावधीत पर्यवेक्षण, संनियंत्रण व सहाय करणे तसेच येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे.मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मोहिम सुरू होण्याआधी दोन दिवस आधी आणि संपूर्ण मोहिम कालावधीत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.तसेच आरोग्य विषयक संदेश देऊन प्रसिद्धी करण्यात येणार आहे.यात कुष्ठरोग इतर आजारांसारखाच रोगजंतुमुळे होणारा आजार आहे, कुष्ठरोग अनुवंशिक नाही, त्याचा संसर्ग फार कमी आहे, बहुविध औषधोपचाराने हा संसर्ग नाहीसा होतो, फिक्कट लालसर, न खासणारा चट्टा कुष्ठरोगाचा असू शकतो. आपल्या शरीरावर चट्टा शोधवा, चट्टा असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवून कुष्ठरोग नाही याची खात्री करून घ्यावी, कुष्ठरोगावरील उपचार सर्व शासकीय रूग्णालयात मोफत आहे. कुष्ठरोगातील असांसर्गिक प्रकारच्या रूग्णांसाठी सहा महिने तर सांसर्गिक रूग्णांसाठी 12 महिने औषधोपचार नियमित घ्यावा लागतो.त्वरीत निदान आणि औषधोपचाराने कुष्ठरूग्णांमध्ये कोणतीही विकृती येत नाही, तसेच घरीच औषधोपचार घेऊन रूग्ण नेहमीचे काम करू शकतो.
या माहिमेत प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील एकूण 26 लाख 55 हजसा 233 नागरीकांची तपासणी करण्‍यात येणार आहे.यासाठी दोन हजार 788 टिम स्थापन करण्यात आल्या आहे.यात पाच हजार 576 आशा व पुरूष स्वयंसेवकांचा सहभाग राहणार आहे.आरोग्य विभागातील एक हजार 404 अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहणार असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.नागरीकांनी घरी येणाऱ्या चमूस सहकार्य करून तपासणी करून घ्यावी, तसेच कुष्ठरोग निमुर्लन कार्यास योगदान द्यावे, असे आवाहन कुष्ठरोग आरोग्य सेवेचे सहायक संचालक डॉ. डी.डी.भगत यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी