जंतनाशक मोहिमेला सुरवात
यवतमाळ,
दि.7 :जिल्ह्यात जंतनाशक मोहिमेला आज सुरवात करण्यात आली. सावरगड, ता.यवतमाळ येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जंतनाशक मोहिमेला
सुरवात झाली.
जिल्हा
परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुणे
म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.डी.भगत, श्रीमती डॉ.दाभेरे, तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. गुजर, सरपंच हरीदास खडके, उपसरपंच सुहास सरगर, नरेंद्र बोकाडे, साथरोग
अधिकारी डॉ. कोषटवार उपस्थित होते.
भारतात
1 ते 19 वयोगटातील 68 टक्के बालकांमध्ये आतड्यांचे दोष आढळून येत असून त्यापैकी
किमान 98 टक्के बालकांमध्ये जंतदोष होण्याची दाट शक्यता असते.यातून रक्तक्षय
निर्माण होऊन कुपोषणाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.यासाठी जंतनाशक मोहिम
राबविण्यात आली.आज सावरगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शाळा आणि शाळाबाह्य
मुलांना जंतनाशक गोळीचे वितरण करण्यात आले.डॉ.भगत यांनी प्रास्ताविक केले.श्रीमती
डॉ.आगरकर यांनी सूत्रसंचालन केले.
000000000

Comments
Post a Comment