शेतक-यांच्‍या समस्‍यासंपर्क अधिका-यांचा पाठपुरावा
* शेतक-यांना मिळतोय दिलासा
यवतमाळदि.28 ः बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रत्‍येक मंडळासाठी नेमण्‍यात आलेल्‍या संपर्क अधिका-यामुळे शेतकरी आपल्‍या समस्‍याअडचणी थेट गावात आलेल्‍या संपर्क अधिका-यांकडे सांगू लागले आहे. त्‍यामुळे या समस्‍या सोडविण्‍यासाठी पाठपुरावा करीत असल्‍याने शेतक-यांच्‍या समस्‍यांची सोडवणूक  होताना दिसून येत आहे.
            बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्‍हयातील १०१ मंडळाकरिता वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी संपर्क अधिकारी म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे हे अधिकारी गावात जावून शेतक-यांची संवाद साधत आहे. राज्‍य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक  श्री. वरटे  यांनी  कुंभा मंडळातील गावांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. यामध्‍ये साखरानरसाळाभुरांडाइंदिराग्रामश्रीरापूर या गावांना भेटी दिल्‍या. कुभां या गावचे सरपंच श्री. घोटेकरउपसरपंचग्रामसेवक, तलाठीमंडळ अधिकारी, कृषी सहायकपोलिस पाटीलगावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी गावाला जोडणारा रस्‍ता दुरूस्‍तीची मागणी ग्रामस्‍थांनी यावेळी केली. गावात पीण्‍याचा प्रश्‍न निकाली काढण्‍याची तसेच गावातील शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्‍य मिळत नसल्‍याने याची तातडीने तजविज करावी असे शेतक-यांकडून सांगण्‍यात आले.  त्‍याचप्रमाणे गावातील शाळांची स्थितीशेतीची स्थितीसंजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थीपिकविमायांची माहिती जाणून घेतली. यावेळी शेतक-यांना गावातील रस्‍तेनाल्‍या दुरूस्‍ती करून देण्‍याची मागणी केली. तसेच गावातील शौचालयसिंचन विहिरपाण्‍याची सुविधा अशा बाबीवी शेतक-यांनी समस्‍या सांगितल्‍या.
            उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेश गायणार यांनी धानोरा मंडळातील येवतीधानोरा आणि  जळका या गावांना भेटी देऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी गावात शेतक-यांना येणा-या समस्‍या गावातील ग्रामस्‍तरीय समितीला सांगाव्‍यात. गावातच ती कशी सोडविता येईल यावर शेतक-यांशी चर्चा केली.  यावेळी कृषी सहायकतलाटीमंडळ अधिकारीपोलीस पाटीलग्रामसेवक यांच्‍यासह शेतकरी उपस्थित होते. 
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी