शिष्यवृत्तीचे नुतनीकरण अर्ज 20 सप्टेंबरपूर्वी सादर करावे
यवतमाळ, दि. 14 : राज्य शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ई-स्कॉलरशिप ही योजना कार्यान्वित केली आहे. त्यानुसार सन 2014-15, 2015-16 आणि त्यापूर्वीचे महाविद्यालयाकडे नुतनीकरणासाठी प्रलंबित राहिलेले अर्ज 20 सप्टेंबरपूर्वी सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज फॉरवर्ड व हार्डकॉपी तात्काळ सादर करावी लागणार आहे, अन्यथ विहित मुदतीत अर्ज सादर केली नसल्यास या विद्यार्थ्यांची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती, शिक्षण फी अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहणार आहे. तसेच विद्यार्थी, महाविद्यालयाचे खाते, आयएफसी कोड चुकलेले आहे, त्यांच्या रकमा दुरूस्त करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याची कार्यवाही करावी, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रवर्गनिहाय सादर करण्यात यावे, तसेच ज्या महाविद्यालयांची खाती असलेली शिष्यवृत्तीच्या अखर्चित रक्कम चलानद्वारे भरण्यात यावी, अन्यथा संबंधित प्राचार्य आणि संस्थांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयांनी फी मंजुरीसाठी सर्व मान्यतेसह सन 2016-17 संलग्नकरणपत्रासह तसेच प्राचार्यांची डिजीटल स्वाक्षरी तयार करून अर्ज फॉरवर्ड करणे, बी स्टेटमेंट सादर करावे, तसेच आवश्यक प्रमाणपत्र सादर करून त्वरीत हे प्रस्ताव कार्यालयात सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण्‍ सहायक आयुक्त यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी