छायाचित्र मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम
यवतमाळ, दि. 14 : छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
दि. 1 जानेवारी 2016 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 16 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदारयाद्यांची प्रसिद्धी, 16  सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. 18 सप्टेंबर आणि 9 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच 16 नोव्हेंबर रोजी दावे आणि हरकती निकाली काढण्यात येणार आहे. 5 जानेवारी 2017 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल