जिल्ह्यात 74 जणांची कोरोनावर मात

 

Ø 61 जण नव्याने पॉझेटिव्ह ; दोघांचा मृत्यु

यवतमाळ, दि. 15 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 74 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 61 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. 

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील  65 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील 84 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 487 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9236 झाली आहे. गुरूवारी 74 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8345 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 293 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 82801 नमुने पाठविले असून यापैकी 82050 प्राप्त तर 751 अप्राप्त आहेत. तसेच 72814 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती