जिल्हाधिका-यांनी घेतली खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीची बैठक

 




यवतमाळ, दि. 29 : जिल्हा खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीकडे जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, शिक्षण, जलसंपदा, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास, भौतिक पायाभूत सुविधा, उर्जा व पाणलोट क्षेत्र विकास इत्यादी विभागाचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले. या प्रस्तावांवर बाबनिहाय चर्चा करण्यात आली. सन 2020-21 व 2021-22 या वर्षासाठी प्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्र यामध्ये उच्च व अन्य प्राथम्य बाबीमध्ये एकूण 240 कोटी रुपये निधीचा आराखडा तयार करण्यात आला असून एकूण 130 कोटी 43 लक्ष किंमतीचे 737 प्रस्ताव प्राप्त झाले. प्रत्यक्ष बाधित क्षेत्रात उच्च व अन्य प्राधम्य बाबीअंतर्गत एकूण 3582.71 लक्ष किंमतीचे 263 प्रस्ताव तर अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रात 9461 लक्ष किंमतीचे 474 प्रस्ताव प्राप्त झाले, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिका-यांनी दिली. जिल्हा खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीकडे विविध यंत्रणांनी सादर केलेल्या प्रस्तावाची छानणी करण्यात येणार आहे.

सदर बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपलीकर, पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता प्रकाश बूब, जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रा. ना. सुरकर, बांधकाम विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता प्रदीप देशटवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. ना. खंडारे, जि.प. चे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार सिडाम, माविम समन्वय अधिकारी रंजन वानखेडे आदी उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी