जिल्ह्यात 24 तासात 22 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

 


यवतमाळ, दि. 4 : जिल्ह्यात गत 24 तासात 22 जण नव्याने कोरोना पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8748 झाली आहे.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 22 जणांमध्ये 16 पुरुष व सहा महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील आठ पुरुष व पाच महिला, उमरखेड शहरातील तीन पुरुष, पांढरकवडा शहरातील तीन पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुषाचा समावेश आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 217 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8748 झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 272 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 244 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 76104  नमुने पाठविले असून यापैकी 75329 प्राप्त तर 775 अप्राप्त आहेत. तसेच 66581 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी