घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिका-यांची सावरगडला भेट

 



Ø पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या सुचना

यवतमाळ, दि. 10 : यवतमाळ शहरातील कच-याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी प्रशासन तसेच नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यवतमाळ नगर पालिकेच्या अंतर्गत असलेला सावरगड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून येथे भेट दिली.

यावेळी जिल्हाधिका-यांनी सावरगड प्रकल्पाची पाहणी करून सदर प्रकल्पाला विरोध असणा-या गावक-यांशी चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, गावचे सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक उपस्थित होते.

या प्रकल्पात येणा-या कच-यामुळे गावात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. मृत जनावरेसुध्दा येथेच आणून टाकले जाते. त्यामुळे माशा तसेच रोगराई पसरत असून नागरिकांना यापासून धोका निर्माण झाला आहे, अशा समस्या येथील गावक-यांनी चर्चेदरम्यान सांगितल्यावर याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे जिल्हाधिका-यांनी गावक-यांना सांगितले.

शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सध्या बंद असलेला सावरगाव येथील कचरा डंपींग यार्ड पुर्ववत सुरू करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारच्या बैठकीत दिल्या होत्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी