114 जणांची कोरोनावर मात, 50 नव्याने पॉझेटिव्ह

 


यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यात गत 24 तासात जिल्ह्यातील 114 जणांनी कोरोनावर मात केली असून 50 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर पांढरकवडा तालुक्यातील 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 50 जणांमध्ये 35 पुरुष आणि 15 महिला आहेत. यात यवतमाळ तालुक्यातील 18 पुरुष व चार महिला, राळेगाव येथील दोन पुरुष, दिग्रस येथील चार पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील दोन पुरुष व तीन महिला, कळंब येथील तीन पुरुष व तीन महिला, घाटंजी येथील एक पुरुष, उमरखेड येथील एक पुरुष व एक महिला, मारेगाव येथील दोन पुरुष व एक महिला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 339 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8818 झाली असून बरे झालेल्यांची संख्या 7559 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 284 मृत्युची नोंद आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेले माहितीनुसार सुरवातीपासून आतापर्यंत 77293  नमुने पाठविले असून यापैकी 76341 प्राप्त तर 952 अप्राप्त आहेत. तसेच 67476 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती