लॉट एन्ट्री न झालेला शेतमाल शेतक-यांना परत मिळणार

 



Ø पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

यवतमाळ, दि. 8 : जिल्ह्यातील पांढरकवडा व दारव्हा खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या परंतु लॉट एन्ट्री न झालेल्या तसेच नाफेडने नाकारलेला शेतमाल आता संबंधित शेतक-यास संपूर्ण खर्च पकडून परत मिळणार आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री तसेच सहकार विभागाकडे नियमित पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

सन 2019 – 20 मध्ये उमरखेड केंद्रावरील हरभ-यांची तसेच पांढरकवडा व दारव्हा  खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या ज्या तुरीची लॉट एन्ट्री विहित कालावधीत होऊ शकली नाही, अशी एकूण 4035.12 क्विंटल तूर व 3748 क्विंटल हरभरा संबंधित तूर खरेदी केलेल्या संस्थेमार्फत सदर शेतक-यास परत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या कार्यवाहीमुळे लॉट एन्ट्री न झालेल्या या तुरीच्या हमीभावाने खरेदी व गोदामात साठवणूक करेपर्यंत झालेला सर्व अनुषंगिक खर्च (बारदाना, तोलाई, हमाली, वाहतूक खर्च व इतर ) संबंधित कर्तव्यात कसूर केलेल्या संस्थेस देण्यात येऊ नये. तसेच त्या संस्थेने या सर्व खर्चाची जबाबदारी घ्यावी. सदरची तूर वखार महामंडळाच्या गोदामातून संबंधित संस्थेस व संस्थेमार्फत शेतक-यांना परत करण्यासाठी होणारा संपूर्ण वाहतूक खर्च, हमाली व इतर खर्च देखील संबंधित संस्थेने करावा, अशा उपसचिव का.गो.वळवी यांनी दी महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीस संचालकास दिले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी