जिल्ह्यात 52 जण कोरोनामुक्त ; 47 नव्याने पॉझेटिव्ह

 

यवतमाळ, दि. 30 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 52 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 47 जण नव्याने पॉझेटिव्ह आले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.30) रोजी एकूण 399 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 47 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 352 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 358 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 98 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10135 झाली आहे.

आज 52 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9045 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 90725 नमुने पाठविले असून यापैकी 90310 प्राप्त तर 415 अप्राप्त आहेत. तसेच 80175 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ******

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी