जिल्ह्यातील पांदण रस्ते मे महिन्यापर्यंत पूर्ण करा



v पालकमंत्र्यांनी दिल्या सुचना
यवतमाळ, दि. 24 : गावागावातील पांदण रस्ते हा ग्रामपंचायतीसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या खात्यात निधीसुध्दा उपलब्ध आहे. या निधीचा उपयोग करून जिल्ह्यातील संपूर्ण पांदण रस्त्याची कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पांदण रस्त्याच्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, यवतमाळचे तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा नियोजन अधिकारी शास्त्री, नरेगा उपायुक्त डॉ. मनोहर नाल्हे, मनोहर शहारे आदी उपस्थित होते.
पांदण रस्त्याच्या कामासाठी क्लस्टर बेस नियोजन करणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात सर्व पांदण रस्त्याची कामे त्वरीत सुरू करा. पेसा अंतर्गत येणा-या गावातील पांदण रस्ते पेसासाठी असलेल्या निधीमूधन करता येणे शक्य आहे. तसेच जलयुक्तचा निधी आणि खनीज अंतर्गत विकास निधीसुध्दा या कामासाठी खर्च करता येऊ शकतो काय, याबाबत नियोजन करा. जिल्ह्यातील सर्व पांदण रस्त्याची कामे एकाच वेळेस करावी. ही कामे जिल्हा परिषद, बांधकाम विभाग तसेच प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना या विभागामार्फत करण्याचे नियोजन करा. ग्रामपंचायतीच्या खात्यात  14 व्या वित्त आयोगाचा निधी आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात ही रक्कम खूप मोठी आहे. तो निधी या कामी वापरण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, ग्रामीण रोजगार हमी योजना आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी