पालकमंत्र्यांच्या हस्ते जांब व ईचोरी येथील रस्त्याचे भुमिपूजन




यवतमाळ, दि. 24 : तालुक्यातील जांब व ईचोरी येथील रस्त्याचे भुमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प.सदस्या रेणू शिंदे, जांबचे उपसरपंच पुरुषोत्तम टिचुकले, नाकापार्डीचे सरपंच पंकज तिवारी, देवानंद काटे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
जांब येथे बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, चार वर्षांत तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या असून दळणवळणाच्या सोयीमुळे गावाचा विकास करता येतो. यापूर्वी वडगाव ते जांब या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. येथे तयार होणारा रस्ता हा चांगल्या दर्जाचा राहणार असून मे 2019 पर्यंत तो पूर्ण करण्यात येईल. यापूर्वी जांब ते खरद रस्त्याकरीता 49 लक्ष रुपये, जांब – चौधरा रस्त्याकरीता 10 लक्ष रुपये देण्यात आले आहे. जिल्ह्यात पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 5 कोटी रुपयांची यंत्रसामग्री आणि मशीन विकत घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.
जांब ते नाकापार्डी या 12.45 किमी रस्त्यासाठी एकूण 6 कोटी 6 लक्ष रुपये खर्च होणार आहे. यात रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणचा समावेश आहे. तर राज्यमार्ग 282 ते ईचोरी हा 2.22 किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 1 कोटी 11 लक्ष रुपये खर्च होणार आहे. या दोन्ही रस्त्याचे कंत्राट हरीदर्शन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेडला देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला दिलीप पुरी, निखील फेंडर, पोलिस पाटील संदीप घोडाम, ग्रामसेविका जयश्री देवतळे, मुख्यमंत्री ग्राम प्रवर्तक कांचन ठाकरे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
बाजार समितीमध्ये हायमास्ट लाईटचे लोकार्पण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेल्या हायमास्ट लाईटचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती रविंद्र ढोक, उपसभापती गजानन डोमाळे, नगरसेवक विजय खडसे, नगरसेविका लता ठोंबरे, कीर्ति राऊत, आनंद उगलमुगले, अजय येंडे, राहुल गर्जे, साधना काळे, बांधकाम विभागाचे चंद्रशेखर इंगोले आदी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी