साहित्य संमेलन थाटात संपन्न होणार - पालकमंत्री मदन येरावार



* 45 वर्षांनी साहित्य संमेलनाचा बहूमान
यवतमाळ, दि. 15 : अखिल भारतीय साहित्य संमेलनाला ४५ वर्षांचा काळ लोटल्यानंतर यवतमाळला आयोजनाचा बहूमान मिळाला आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व व्यवस्था उत्कृष्ट दर्जाच्या कराव्यात, तसेच साहित्य संमेलन थाटात संपन्न होईल याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनच्या पुर्वतयारी बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, आमदार राजू तोडसाम,जेष्ठ साहित्य‍िक रमाकांत कोलते, पद्माकर मलकापुरे आदी उपस्थित होते.
श्री. येरावार म्हणाले, साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने जिल्ह्यासोबतच इतर जिल्हा, राज्य आणि विविध प्रांतातील साहित्य‍िक येतील. काम पूर्ण करण्याची ही संधी असल्याने येथे येणाऱ्यांच्या सोयीसाठी बांधकाम विभागाने मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करावीत. तसेच साहित्य संमेलनानिमित्त येणारे पाहूण्यांचे आदरतिथ्य योग्यरित्या होणे आवश्यक आहे. तसेच शहरातील स्वच्छता, विजेची व्यवस्था, विविध माध्यमातून प्रसिध्दी होण्यासाठी प्रयत्न करावे. अखिल भारतीय साहित्य संमेलन सुव्यवस्थित पार पाडावे, यासाठी येत असलेल्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागाने सहकार्य करावे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या श्रोत्यांसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था, शहरालगतच्या नागरिकांना रात्री घरी परत जाता यावे यासाठी जादा बसेस फेऱ्या उपलब्ध करण्‍यासंदर्भात संबंधित विभागांना सुचना देण्यात आल्या. साहित्य संमेलन हे समाजमनाला नवउर्जा देणारा असतो. संमेलनस्थळी प्रत्यक्ष येऊ शकनार नाहीत अशांकरीता स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे, असे त्यांनी सांगितले.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी