लोकशाही दिनात आलेल्या तक्रारी त्वरीत निकाली काढा -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह


यवतमाळ, दि. 7 : सामान्य नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कधीकधी एकच तक्रार सलगच्या लोकशाही दिनात सादर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत संबंधित अधिका-यांनी संवेदनशीलता दाखवून त्या त्वरीत निकाली काढाव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, लोकशाही दिन हा सामान्य नागरिकांसाठी आहे. आपल्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनातमार्फत त्या सोडविल्या जातात, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. ज्या विभागाची  प्रकरणे वारंवार प्रलंबित राहत असेल त्यांनी याबाबत संवेदनशीलता दाखवावी. लोकशाही दिनात दाखल झालेली तक्रार पुढील लोकशाही दिनाच्या पूर्वी निकाली निघण्यासाठी संबंधित अधिकारी – कर्मचा-यांनी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. यावेळी लोकशाही दिनातील प्रलंबित तक्रारींचा जिल्हाधिका-यांनी आढावा घेतला.
आजच्या लोकशाही दिनात एकूण 10 तक्रार अर्ज प्राप्त झाले. यात महसूल विभाग 2, उपजिल्हाधिकारी भुसंपादन 1, नगर परिषद 1, भुमिलेख विभाग 1, पाटबंधारे विभाग 1, जिल्हा परिषद 1, सार्वजनिक बांधकाम 1, रोहयो 1 आणि वनविभागासंदर्भात 1 तक्रार अर्जाचा समावेश आहे. तसेच मागील लोकशाही दिनी प्रलंबित 127 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विखे पाटील यांना अभिवादन :

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. विखे पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी इतरही मान्यवरांनी डॉ. विखे पाटील यांना अभिवादन केले.                                                                  000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी