कुष्ठरोग निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न करा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह



यवतमाळ, दि.03 : कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे. कुटुंबातील व्यक्तींनी हा रोग लपविण्याचा प्रयत्न केला तर इतरांना त्याची लागण होण्याची शक्यता आहे. असा प्रकार आपल्या कुटुंबासाठी जास्त घातक ठरू शकतो. त्यामुळे कुष्ठरोग निर्मुलन मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच आरोग्य यंत्रणा व संबंधित यंत्रणेने या रोगाच्या निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.

कुष्ठरोगाबाबत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा आज (दि.3) जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कुटुंबातील सदस्याकडून किती मुलांना या रोगाची लागण झाली, ते त्वरीत कळविण्याबाबत आदेश देऊन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह म्हणाले, खाजगी डॉक्टरांकडून कुष्ठरोग रुग्णांची नावे व संख्या गोपनीय ठेवण्याच्या अटीवर आरोग्य विभागाने प्राप्त करून घ्यावी. एप्रिल ते जुलै 2017 या कालावधीत नवीन शोधलेल्या रुग्णांमध्ये 45 स्त्रियांना तसेच 9 मुलांना कुष्ठरोग असल्याचे निदर्शनास आले. हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुष्ठरोग निर्मुलनासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच संबंधित सर्व यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, आरोग्य सेवा कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ.डी.डी.भगत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.एस.ढोले, जिल्हा परिविक्षा अधिकारी आर.एस.खरात, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पी.आर.चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी