पालकमंत्र्यांच्या हस्ते “आपला जिल्हा यवतमाळ” पुस्तिकेचे प्रकाशन

यवतमाळ, दि. 16 :  यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आपला जिल्हा यवतमाळ या संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी आदी उपस्थित होते.
या संदर्भ पुस्तिकेत जिल्ह्याची पार्श्वभुमी, वैशिष्ट्ये, तालुक्यांची संख्या व क्षेत्रफळ, एकूण गावांची तसेच ग्रामपंचायतींची संख्या, तालुकानिहाय लोकसंख्या, नद्या, डोंगररांगा, वनक्षेत्र, वन्यजीव, अभयारण्य, शाळा- महाविद्यालये, जिल्ह्यात साजरे होणारे महत्वाचे सण, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, कृषी क्षेत्र, उद्योग, जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व सर्वधर्मीय तीर्थस्थळे आदींची माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तिका बहुरंगी स्वरुपात आहे. 

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी