प्रताप महाविद्यालयात अवयवदानाबाबत जागृती
            यवतमाळ, दि. 25 : प्रेरणा प्रकल्प, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय, यवतमाळ यांच्यातर्फे बाभुळगाव येथील प्रताप महाविद्यालयात अवयवदानाबाबत जागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य सुनंदा भारंबे, पर्यवेक्षक आनंद मेश्राम, तालुका गटसमन्वयक श्रीमती संगिता उपपस्थित होत्या. चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ सरफराज सौदागर यांनी अवयवदानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. अवयवदानामुळे मृत्यूनंतरही मनुष्य विविध अवयवांमुळे जिवंत राहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक मोहित पोहेकर यांनी अवयवाअभावी देशात दररोज सहा हजार व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे सांगितले. अवयव मिळाले नसल्याने मृत्यू होत असल्याबाबत देशाची स्थिती सांगून अवयवदानासाठी उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमासाठी किरण दिघडे आणि रेखा पिंपळकर यांनी पुढाकार घेतला.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी