मंगळवारी उद्योग केंद्राच्या कार्यपथक समितीची सभा
·        कर्ज घेणाऱ्यांच्या मुलाखती होणार
यवतमाळ, दि.16 : यवतमाळ जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्ज योजनेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज केलेल्यांच्या मुलाखती आणि कार्य पथक समितीची सभा मंगळवार, दि. 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित करण्यात आली आहे.
 सुधारित बिज भांडवल योजनेंतर्गत सन 2016-17 मध्ये या कार्यालयात ज्या अर्जदारांनी 30 जुलैपर्यंत अर्ज सादर केले आहेत, त्यांची 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जदाराची मुलाखत घेण्यात येणार आहे. संबंधित अर्जदारांनी मुलाखतीसाठी मुळ कागदपत्र घेवून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल