‘यवतमाळ का राजा’तर्फे सकस आहार वाटप
यवतमाळ, दि. 31 :  येथील यवतमाळ का राजा नवयुवक गणेश उत्सव मंडळातर्फे 500 एचआयव्हीसह जगणाऱ्या 500 बालकांना सकस आहाराचे वाटप दि. 6 ते 13 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे.
एचआयव्ही संसर्गीत, प्रभावित अनाथ आणि असुरक्षित बालकांना प्राधान्याने पोषक आहार, आरोग्य, शिक्षण, सामाजिक संरक्षण आणि कल्याणकारी सेवा उपलब्ध करून देण्याकरीता कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्टच्या विशेष प्रकल्पांर्गत जिल्ह्यात DAPCU यवतमाळच्या समन्वयाने सुरु आहे. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांना नियमित सकस आहार, प्रथिनेयुक्त अन्नाची नितांत आवश्यकता असते. बालकांची ही गरज लक्षात घेता DAPCU Nutrition support Unit for CABA स्थापन करण्यात आले आहे. पथक विविध सामाजिक संस्था, क्लब, मंडळ इत्यादीच्या सहकार्याने कार्यक्रम घेते.
DAPCU Nutrition support Unit for CABA आणि OVC social protection project Vihaan अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्यामुळे अशी बालके पहिला वाढदिवसही साजरा करु शकत नाही. अशा बालकांना नियमितपणे सकस आहार मिळाल्यास बालकांना त्यांचे जीवन अधिक आनंदाने सुखकर जगता येईल. बालकांना मदत करण्याकरीता व्यक्ती, सामाजिक संस्था, क्लब, मंडळ यांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या आणि प्रभावित बालकांना सकस आहार वितरण करावयाचे असल्यास अशा व्यक्ती, संस्था, समिती, मंडळ, क्लब आदींनी जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथक यवतमाळ यांच्याशी 07232-239515 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी