दोन दिवस मद्यविक्री बंद
यवतमाळ, दि 31 : पोळा आणि तान्हा पोळा दि. 1 आणि 2 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात उत्साहात
साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक
उपाययोजनेच्यादृष्टीने जिल्ह्यात दोन दिवस मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात दिनांक
1 आणि 2 सप्टेंबर रोजी मद्यविक्रीच्या सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या मद्यविक्रीस बंदी
घालण्यात आली आहे. या दिवशी मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात
येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment