आपत्ती व्यवस्थापनातर्फे जनजागृती प्रशिक्षण
            यवतमाळ, दि. 31 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत एनडीआरएफ तळेगाव, पुणेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
एनडीआरएफची 25 व्यक्तींने प्रशिक्षण आणि रंगीत तालीम दि. 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत घेण्यात येत आहे. या प्रशिक्षणादरम्यान दि. 29 ऑगस्ट रोजी लोहारा एमआयडीसी येथील राणा इंडस्ट्रीज येथे औद्योगिक अपघात, आपत्तीबाबत रंगीत तालीम केली. रंगीत तालीममध्ये कारखान्यामधील आग लागण्याची कारणे, उपलब्ध रसायनांमुळे होणारा अपघात, त्याला द्यावयाचा प्रतिसाद, अपघात होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत एनडीआरएफने रंगीत तालीममधून दाखविले.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख उपस्थित होते. रंगीत तालीममध्ये फायर ब्रिगेड, नगर परिषद, 108 ॲम्बुलंस, शल्य चिकित्सक, वाहतूक पोलिस विभागातील चमू, बीडीएस स्कॉडची चमू, जिल्हास्तरीय शोध आणि बचाव पथक आदींनी रंगीत तालीममध्ये सहभाग घेतला.
एमआयडीसी महाव्यवस्थापक, विविध उद्योजक, राणा इंडस्ट्रीजचे सर्व कर्मचारी यात सहभागी झाले. रंगीत तालीमीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिनल जगताप यांनी नियोजन केले. नैसर्गिक आपत्ती विभागातील नायब तहसिलदार एकनाथ बिजवे, मंडळ अधिकारी उमेश जुमडे, वरीष्ठ लिपिक मंगेश सुळके, प्रशांत माळवी, कनिष्ठ लिपिक नितीन पाटकुरवार, सतिष कांबळे, नितिन मांडेकर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी