उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, कार्यकर्ता,
ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि.24 :राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत ग्रंथालय संचालनालयाद्वारे सन 2016-17 साठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, तसेच डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथालय कार्यकर्ता आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी 10 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा, तसेच चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, याहेतूने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीत योगदान देणारे सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक यांना चांगल्या सेवा देण्याच्या उद्देशाने डॉ. एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील अ,ब,क,ड, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजाररुपये, 30 हजाररुपये, 20 हजार रुपये आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र आणिस्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येते. राज्यस्तरावर एक उत्कृष्ट कार्यकर्ता आणि सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख तसेच महसूल विभागस्तरावर एक कार्यकर्ता आणि सेवक यांना प्रत्येकी रूपये 15 हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येते.
या पुरस्कारासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज 10 सप्टेंबर 2016 पर्यंत दोन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी