केंद्र शासनाच्या योजनांची चांगली अंमलबजावणी करा
- केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा
यवतमाळ, दि.13 : केंद्र शासनाच्यावतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची चांगल्या पदध्तीने अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषद अध्यक्षा डॅा.आरती फुपाटे, आ.डॅा.अशोक उईके, आ.राजेंद्र नजरधने, आ.राजु तोडसाम, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, विभाग प्रमुख  अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.अहीर यांनी केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेतला. योजनांची प्रगती व अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, डिजीटल इंडिया ॲन्ड रेकॅार्ड मॅाडर्नायझेशन प्रोग्राम, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामीण मिशन, राष्ट्रीय शहरी मिशन या योजना ग्रामपातळीवर चांगल्या प्रकारे राबविण्याचे निर्देश श्री.अहीर यांनी दिले.
बैठकीत अटल मिशन फॅार रिज्युएशन ॲन्ड अर्बन ट्रान्सफार्मेशन, उज्वल योजना, प्रधानमंत्री पिकविमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास कार्यक्रम, माध्यान्ह भोजन योजना, डिजीटल इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना, जिवनोन्नती अभियान, ग्रामीण आवास योजना या योजनांचाही आढावा श्री.अहीर यांनी घेतला.
यावेळी बोलतांना राज्यमंत्री श्री.येरावार यांनी ज्या शाळांना वीज जोडणी नाही त्या शाळांना कनेक्शन देण्याचा विशेष कार्यक्रम घेण्याचे निर्देश वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. शहरी आवास योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शिल्लक हप्त्याचे वाटप करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांच्याबाबतीत ठोस कार्यवाही करण्याची सुचना त्यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

            जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यवतमाळ येथे रूजू झाल्यापासून जिल्ह्याच्या प्रशासनात प्रचंड गतिमानता आली आहे. जिल्ह्याच्यादृष्टीने अनेक चांगल्या बाबी घडत आहे. ही अतिशय समाधानकारक बाब आहे. वणी परिसरातून चंद्रपूर जिल्ह्याला होत असलेल्या अवैध मद्य पुरवठ्यावर पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १४ दुकाने कायमस्वरूपी रद्द केले तर एक निलंबित केले यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतूक करत आ.राजू तोडसाम यांनी मांडलेला जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत घेण्यात आला. 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी