गुरूवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
यवतमाळ, दि. 9 : औरंगाबाद येथील नामांकीत कंपन्यांकरीता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा गुरूवारी, दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता यवतमाळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आला आहे.
पात्र इच्छुकांनी मेळाव्यास दहावीची गुणपत्रिका, आयटीआय उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, जन्म तारखेचा दाखला आदी प्रमाणपत्रांच्या झेरॅाक्सप्रतीसह उपस्थित राहावे. मेळाव्यास येणाऱ्यांना प्रवास खर्च दिला जाणार नाही, जिल्ह्यातील इच्छुकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल रेड्डीवार यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी