पालकमंत्र्यांच्याहस्ते सायबर लॅबचे १५ ऑगस्टला उद्‌घाटन
* राज्यात ४४ लॅब सुरू होणार
* गृह विभागाचा महत्वपूर्ण उपक्रम
यवतमाळ, दि.13 : महाराष्ट्र पोलिस दलातर्फे राज्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी ४४ सायबर लॅब १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येत आहे. यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते पोलिस अधिक्षक कार्यालयात या लॅबचे उद्घाटन होणार आहे.
मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर सकाळी १० वाजता लॅबचे उद्घाटन होईल. यावेळी खासदार, आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह आदी उपस्थित राहतील. पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या इमारतीत सदर अत्याधुनिक लॅब उभारण्यात येणार आहे. या लॅबमध्ये अत्याधुनिक सुविधांसह संगणक, आवश्यक अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसात इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेच व्हॅाट्सअप, फेसबूक व इतर सोशल माध्यमांचा गैरवापर देखील होत आहे. अशा सर्व गुन्ह्यांचा तपास व नियंत्रण ठेवण्यासाठी या लॅबचा पोलिस दलास उपयोग होणार आहे. उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी