शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडावे
* समाज कल्याण विभागाचे आवाहन
यवतमाळ, दि.24 : महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्यांस विभागाच्याhttp://mahaeschol.maharashtra.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरलेनंतर विद्यार्थ्यांनी आपला मागास प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, रहिवास, उत्पन्न मागील वर्षाचा उत्तीर्ण दाखला या विषयाचे पुरावे महाविद्यालयास सादर करणे अनिवार्य आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परिक्षा फीसाठी पात्रता निश्चित होते.
पात्र विद्यार्थ्यांस मिळणारी शिष्यवृत्ती (निर्वाह भत्ता) हा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर आणि शिक्षण फीची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते. अधिकृत बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणेसाठी खालील बाबींची पुर्तता विद्यार्थी/पालक/महाविद्यालयाने करणेबाबत जाहिर आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांने आपल्या आधार क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डाची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे त्या बँकेच्या खाते क्रमांकाची खात्री होणेसाठी  पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केले असल्याबाबतचा पुरावा म्हणून बॅकेकडून आधार संलग्नता केले बाबतची पावती (आधार सिडींग स्लिप) सोबत जोडावी., विद्यार्थी/पालकांनी प्रस्तावासोबत आधार क्रमांक आणि तो बँकेशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा जोडला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर, त्यांचा आधार क्रमांक वैध असल्याची खात्री करून शिष्यवृत्तीची रक्कम तसेच महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण शुल्काची रक्कम प्राधान्याने जमा केली जाईल. तेव्हा सर्व विद्यार्थी/पालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना आवाहन करण्यात येत आहे की, उपरोक्त कागदपत्रे पोर्टल सुरु होण्यापुर्वी तयार ठेवावीत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी