महिला महाविद्यालयात ‘अर्श’ कार्यशाळा
यवतमाळ, दि. 10 : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातर्फे राबविण्यात येणारा ‘अर्श’ (किशोरवयीनाचे प्रजनन आणि लैंगिक आरोग्य) कार्यक्रमाची कार्यशाळा महिला विद्यालयात पार पडली.
कार्यशाळेच्या सुरवातीला अर्श कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. अर्श म्हणजे किशोरवयीन मुला-मुलींचे प्रजनन आणि लैंगिक कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. किशोरवयीन म्हणजे काय, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, स्वच्‍छता, मासिकपाळीचे चक्र, प्रजनन आणि लैंगिक आजारांची लक्षणे आणि उपाय एचआयव्ही एड्स, किशोर वयातील पोषक आहार, किशोरवयात होणारे शारीरिक, भावनिक, मानसिक, लैंगिक बदल, ॲनिमियाची लक्षणे, घ्यावयाची काळजी आणि उपचाराविषयाची माहिती देण्यात आली. तसेच अभ्यासपद्धतीचा अर्थ स्पष्ट केला. सकारात्मक विचारांनी जीवनात निर्माण होणारी यशस्विता यावर मार्गदर्शन करण्यात आले. मुलींना त्यांच्या वैयक्त‍िक अडचणी विचारण्यात आल्या. त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान करण्यात आले. याविषयी अडचण निर्माण झाल्यास कार्यालयात भेटण्यास सांगितले.
कार्यक्रमाला मुख्यध्यापिका श्रीमती देशपांडे, श्रीमती कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यशाळेत संपूर्ण माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयाच्या अर्श कार्यक्रम समन्वयक किरण ठाकरे यांनी दिली.

0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी