शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन
*नुतनीकरण करण्याची आवश्यकता
यवतमाळ, दि. 29 : समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, फ्रीशीप, शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, विद्यावेतन, परराज्य शिष्यवृत्ती आणि सैनिक शाळांचे अर्ज भरणे आणि महाविद्यालयांच्या नुतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज भरणे आणि महाविद्यालयांनी नुतनीकरण करण्यासाठी सन 2016-17 साठी mahaeschool.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरु झाले आहे. सर्व लाभधारकांनी ऑनलाईन अर्ज भरावे, तसेच महाविद्यालयांनी नुतनीकरण करावे, तसेच भरलेले अर्ज हार्ड कॉपी आणि स्टेटमेंट बी रिपोर्टसह समाज कल्याण विभागाकडे त्वरीत सादर करावे, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी