आजपासून अवयवदानाचा महायज्ञ
            यवतमाळ, दि. 29 : देशभरात सुमारे पाच लाख मुत्रपिंड, 50 हजार यकृत आणि दोन हजाराहून अधिक रूग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहे. राज्यात सुमारे 12 हजार रूग्णांना विविध अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत पंतप्रधानांनी टाकलेल्या विचाराने प्रेरीत होऊन राज्यात महाअवयवदान अभियान मंगळवार, दि. 30 ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यात एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या प्रयत्नामुळे अवयवदानासाठी प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात येणार आहे. रक्त आणि नेत्रज्ञानासाठी अनेक जण समोर येत असल्याने आज समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे अवदानाची ही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबवून समाजाचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर मृत्यूनंतर करावयाच्या अवयवदान भारतात अत्यल्प आहे. सामाजिक आणि कौटुंबिक जनजागृतीतून अवयवदानाबाबत आमुलाग्र बदल घडवून आणावयाचा आहे. यासाठी 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान महा अवयवदान शिबिर राज्यभर घेण्यात येणार आहे.
जिवंत किंवा मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीचे जे अवयव निकाली झाले आहे त्यांना अवयवदान करून नवजीवन देण्याचा हा प्रयत्न आहे. अवयवाचा पूर्ण किंवा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून तो गरजवंतामध्ये प्रत्यारोपित करण्यात येतो. मेदूस्तंभ मृत्यू झालेल्या रूग्णाचे साधारणत: सर्वच अवयव दान करता येऊ शकतात. सामान्य मृत्यूमध्ये केवळ डोळे आणि त्वचेचे दान करू शकतात. जिवंतपणी केवळ मूत्रपिंड, यकृताचा काही भाग दान करू शकतो. केवळ जवळच्या नातेवाईकांमध्येच अवयवदान करू शकते. मस्तिकस्तंभ मृत्यूनंतर रूग्णालयातच अवयवनाचे दान होऊ शकते. डोळे आणि त्वचेचे मृत्यूनंतर सहा तासात दान करता येते. मस्तिकस्तंभानंतर अवयवदानाची प्रक्रिया ही मानवी अवयव प्रत्यारोपण कायदानुसार नियंत्रण केले जाते. अवयवदानानंतर मृत व्यक्तीचे शरीर सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी परत दिले जाते. दान केलेले अवयव शासनाच्या नियमानुसार प्रतिक्षेतील गरजू रूग्णांनाच दिले जाते. यासाठी समन्वय समिती असून त्यांच्यामार्फत पारदर्शक पद्धतीने ही सर्व कार्यवाही होते. अवयन कोणत्या व्यक्तीला दिले आहे, याची माहिती अवयवदान करणाऱ्या नातेवाईकांना सांगितली जात नाही.
एखाद्या जिवंत व्यक्तीवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेप्रमाणे अवयव काढल्या जातात. त्यामुळे दात्याच्या शरीरावर विद्रुपता येत नाही. शरीरावर, पोटावर आणि छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात. अवयवदानाची संमती दिल्यानंतर अवयवदानासाठी करण्यात येणाऱ्या  चाचण्या तसेच इतर वैद्यकीय खर्च मृताच्या नातेवाईकांना करावा लागत नाही. अवयवदानासाठी कोणताही मोबदला दिला जात नसल्याने हे शुद्ध आणि श्रेष्ठदान ठरते. त्यामुळे अवयवदानाची इच्छा असलेल्यांनी संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर जवळच्या नातेवाईकांची स्वाक्षरी देखील आवश्यक आहे. फॉर्म भरल्यानंतर संबंधित व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाते. हे डोनर कार्ड सतत जवळ बाळगल्यास त्याच्या मित्र आणि नातेवाईकांना त्याच्या अवयवदानाविषयी माहिती होईल. जवळच्या नातेवाईकांच्या सहमतीशिवाय अवयवदान होऊ शकणार नसल्याने त्यांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी