यवतमाळ उत्पादन शुल्कची सोलापूरात कारवाई
*भरारी पथकासोबत कारवाई
*स्पिरीटचा अवैध टँकर पकडला
*25 लाखांचा स्पिरीट जप्त
            यवतमाळ, दि. 20 : छत्तीसगड येथून गोवा येथे जात असलेल्या स्पिरीटचा अवैध टँकर सोलापूर येथील जुना नाका परीसरात सापळा रचून संयुक्त कारवाई करण्यात आली. यवतमाळ राज्य उत्पादन शुल्कने मुंबई येथील भरारी पथकाच्या सहकार्याने यवतमाळ ते सोलापूर असा माग काढीत ही कारवाई केली.
            राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्त श्रीमती व्ही. राधा आणि राज्य उत्पादक शुल्कचे संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता छत्तीसगड येथून गोवा राज्यात चोरट्या मार्गाने स्पिरीटचा अवैध टँकर क्रमांक एमएच 6 एसी 5505 या टँकरवर अमोनिया लिक्विड नमूद असलेल्या टँकरमधून नेत असल्याची माहिती मिळाली. याबाबत यवतमाळ येथी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनाही निर्देश देण्यात आली. त्यानुसार निरीक्षक ए. बी. झाडे, प्रभारी निरीक्षक यू. एन. शिरभाते, सहायक दुय्यम निरीक्षक एस. जी. घाटे, आर. एम. राठोड, ए. बी. पेंदोर, जवान एस. एन. घाडगे, ए. ए. पठाण, पी. एच. राठोड, एस. आर. मनवर, एम. आर. खोब्रागडे, बी. सी. मेश्राम यांनी यवतमाळ ते सोलापूर खासगी वाहनाने या टँकरचा माग काढला. सोलापूर येथील जुना नाका परिसरात भरारी पथक आणि यवतमाळ उत्पादन शुल्क यांनी सापळा रचून कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या टँकरमध्ये अंदाजे 20 हजार लिटर स्पिरीटचा अवैध साठा आढळून आला. या स्पिरीटची किंमत 25 लाख रूपये आहे. आरोपी आणि मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात देऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे करीत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी