चर्मकार समाजातील मुलांसाठी प्रशिक्षण योजना
यवतमाळ, दि. 31 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने  चर्मकार समाजातील मुला, मुलींसाठी व्यावसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने  प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 
अर्ज करणारी संस्था व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसेच, व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळाकडून मान्यताप्राप्त अथवा इतर तत्सम संस्थांशी संलग्नता असावी. संस्था सलग पाच वर्षांपासून कार्यरत असावी. तीन वर्षाचे ऑडिट पूर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, यंत्रसामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. मागील तीन वर्षात ट्रेडनिहाय किती प्रशिक्षणार्थींना वर्षनिहाय प्रशिक्षण दिले आहे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किती प्रशिक्षणार्थींना स्वत:चा व्यवसाय सुरू केला किंवा नोकरी मिळाली आहे काय, एकुण प्रशिक्षणार्थीपैकी 30 टक्के महिला असणे आवश्यक आहे. संस्थेस ट्रेडनिहाय किती विद्यार्थ्यांची मान्यता आहे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल, जॉब प्लेसमेंटची काय व्यवस्था आहे, बाहेरगावाच्या प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकेल काय, याचा तपशील सोबत देणे आवश्यक आहे. वरील अटींची पुर्तता करीत असलेल्या प्रशिक्षण संस्थांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी आपला प्रस्ताव दि. 5 ते 13 सप्टेंबरदरम्यान सादर करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल