केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याहस्ते बियाणे वाटप
यवतमाळ, दि.24 :केंद्रीयगृहराज्यमंत्रीहंसराजअहिरयांच्याहस्तेआज वटबोरी येथे भाजीपाला बियाण्यांचेवाटप करण्यात आले. यावेळी आमदार राजू तोडसाम, वटबोरीच्या सरंपच मोनिका शिवारे, राजू डांगे, दिनकर पावडे, अमोल ढोणे, अंकूश डोळे, पंडीतराव चावरे आदी उपस्थित होते.
रस्त्यालगतच्या गावांमध्ये भाजीपाला पिकांचे बियाणे वाटप करून त्यातून उत्पादीत होणारा माल त्याच गावात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री.अहिर म्हणाले, शेतकऱ्यांना जादा लाभ मिळण्यासाठी उत्पादीत मालाची विक्री आणि त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.सध्या शेतीमधून शाश्वत उत्पन्न येण्याचे हमी नसल्याने शेतीवर अवलंबून चालणार नाही.शेतीतून जादा उत्पन्न येण्यासाठी पिकांचे नियोजन करावे लागणार आहे.पारंपरीक पिकांपासून दूर होत आता इतर पिकांकडे वळणे गरजेचे आहे.यासाठी गेल्यावर्षीपासून भाजीपालाचे बियाणे वाटप करण्यात येत आहे.जिल्ह्यात यावर्षी तीन हजार शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे येत्या काळात गावात भाजीपाल्याचे क्लस्टर उभारण्यात येणार आहे.याचा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार आहे.या भाजीपाल्यांना सेंद्रीय पद्धतीची जोड मिळाल्यास उत्पादनाला दुप्पट भाव मिळणे शक्य आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी जोडधंदे उभे करण्यावर येत्या काळात भर देण्यात येणार आहे.त्यासाठी आत्महत्या केलेल्या 142 शेतकऱ्यांच्या विधवांना दुधाळ जनावरे देण्यात येणार आहे. त्यासोबतच मुद्रा योजनेतूनही विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने गावातील नागरीकांनी शेती ही एक उद्योगाचे साधन मानून येत्या काळात समोरे जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी गावातील दुधावर प्रक्रिया करून गावातच विक्री करणारे पंडीतराव चावरे, मोहन घाटोळ, प्रेमिला घाटोळ यांचा सत्कार करण्यात आला.पंडीतराव चावरे यांनी श्री.अहिर यांचा राधा-कृष्णाची मुर्ती देऊन सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी