कन्यादान योजनेचा लाभ घ्यावा
*सेवाभावी संस्थाना आवाहन
यवतमाळ, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडातर्फे कन्यादान योजनेअंतर्गत विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकल्प कार्यालयाच्यावतीने कन्यादान योजनेअंतर्गत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. अशा प्रकारचे विवाह सोहळे आयोजन करणाऱ्या पात्र अशासकीय संस्थांनी 2016-17 करीता आयोजित करण्यात येणाऱ्या सामुहिक विवाह सोहळ्याकरीता विहित नमुन्यातील आवेदन व प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा येथे सादर करावे लागणार आहे.
मुलींच्या विवाहासाठी लागणाऱ्या खर्चामुळे अनेकांना चिंता पडते. अशा कुटुंबासाठी हा खर्च चिंता वाढविणार ठरतो. विवाहावर होणारा हा अनाठायी खर्च काढण्यासाठी शासन सामुहिक सोहळ्याच्या माध्यमातून जोडप्यांचे विवाह लावून देते. एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयामार्फत सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत विवाह करण्याऱ्या जोडप्यास 10 हजार रुपये रोख व स्वयंसेवी संस्थेला प्रत्येकी 10 हजार रुपयाचे अनुदान दिल्या जाणार आहे. विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी किमान दहा जोडपी आवश्यक आहे.
सोहळ्यामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 असावे, दोघांपैकी एक जण आदिवासी असावा, त्यांच्याकडे जात आणि जन्माचा दाखला असावा, दोघेही प्रथम विवाह करीत असावे, विवाहाची नोंद असणे आवश्यक आहे, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग झालेला नसावा, त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे्
पात्र अशासकीय संस्थांनी कन्यादान योजनेंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी विहित नमुन्यातील आवेदन अणि प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी