स्वातंत्रदिनी उत्पादन शुल्कच्यावतीने रक्तदान महाशिबिर
        यवतमाळ, दि. १३ : भारतीय स्वातंत्र्याच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने यवतमाळ येथे डी.एम.एम.आयुर्वेद महाविद्यालयात दिनांक १५ आगस्ट रोजी रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            भारतीय स्वातंत्र्यासाठी अतुलनिय कामगिरी बजावणाऱ्या विर शहिदांना नमन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन दरवर्षीच उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात येत असते. रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासते परंतु त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होत नाही. त्याचा रूग्णांसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रीयांवर परिणाम होतो. याशिवाय विविध आजारांच्या रूग्णांना वारंवार भासणारी रक्ताची गरज भागविण्यासाठी सदर महाशिबिर घेण्यात येत असते.
            उत्पादन शुल्कच्यावतीने १५ आगस्ट २०१४ पासून दरवर्षी सदर शिबिर घेण्यात येते. पहिल्या शिबिरात ११५ रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते. त्यानंतर वणी, पुसद, यवतमाळ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगी घेण्यात आलेल्या शिबिरात आतापर्यंत ३ हजार ५८३ इतक्या रक्त पिशव्यांचे विक्रमी संकलन झाले आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०१५ मध्ये वणी येथे घेतलेल्या एकाच शिबिरात १०९० पिशव्यांचे संकलन झाले होते. या शिबिरातही विक्रमी रक्त संकलीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत शिबिर चालणार आहे.
            विशेष म्हणजे दारू व्यावसायिकांच्या सहकार्याने या शिबिरांचे आयोजन केले जाते. दिनांक १५ आगस्ट रोजी आयोजित शिबिरात यवतमाळ डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएशन, यवतमाळ जिल्हा मद्य विक्रेता संघ, अन्न व औषध प्रशासन यांच्या सहयोगाने सदर शिबिर होत आहे.  या महाशिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन केले जाणार आहे. यवतमाळ व परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदानास उपस्थित राहावे, असे आवाहन विभागाचे अधिक्षक पराग नवलकर तसेच सहयोगी संघटनांनी केले आहे.  

0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी