'आपलं मंत्रालय' गृहपत्रिकेचे
१५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकाशन
यवतमाळ, दि. १३: लोकराज्य, महाराष्ट्र अहेड, उर्दू लोकराज्य या वाचकप्रिय शासकीय नियतकालिकांचीनिर्मिती करणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने मंत्रालयीन अधिकारीकर्मचाऱ्यांसाठीअभिव्यक्तीचे नवे दालन 'आपलं मंत्रालय' या गृहपत्रिकेमार्फत उघडले आहे. या नियतकालिकाचे प्रकाशन१५ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी १२.३० ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारआहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह हे या गृहपत्रिकेचे मुख्य संपादक आहेत.
        महाराष्ट्राच्या ध्येयधोरणाला आकार देणाऱ्या मंत्रालयातील सुमारे ७ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या व्यस्ततेतही व्यक्त होण्यासाठी या नियतकालिकाचा उपयोग होणार आहे. मंत्रालयीन अधिकारी आणिकर्मचाऱ्यांच्या आशा, आकांशा, अपेक्षांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे. मंत्रालयातील प्रमुख घडामोडी,कर्मचाऱ्याबद्दलचे महत्वाचे निर्णय यासोबतच मंत्रालयातील लेखक, कवी, कलावंत, खेळाडू यांनाहीअभिव्यक्त होण्यासाठी या माध्यमातून संधी मिळणार आहे. याशिवाय पदोन्नतीची माहिती, निवृत्तीची खबर,कर्मचाऱ्यांच्याकुटुंबियांच्या उपलब्धीलाही यामध्ये प्रसिध्दी दिली जाणार आहे. ४० पृष्ठसंख्याअसणारे हेनियतकालिक मोफत वितरणाचे असून कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद व समन्वय राखण्यासाठी उपयुक्त ठरणारआहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी