सातारा येथील मेस्को ॲकॅडमी प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 30 : यवतमाळ येथे सहा जानेवारी 2017 रोजी नागपूर विभागाची सैन्य भरती होणार आहे. या सैन्यभरतीसाठी सातारा येथील मेस्को करीअर ॲकॅडमीच्या वतीने भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सातारा, करंजे नाका येथील ही ॲकॅडमी राज्य शासनाचा एक उपक्रम आहे. या ठिकाणी अल्प दरात सैन्य भरतीपुर्व प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये मैदानी आणि लेखी परीक्षेच्या तयारी करून देण्यात येणार आहे. तसेच ॲकॅडमीमध्ये निवास आणि भोजनाची सुविधा आहे. त्यासाठी मासिक शुल्क सहा हजार 500 रूपये इतके आकारल्या जाणार आहे. हे शुल्क प्रवेश घेतेवेळी भरावे लागणार आहे.
अधिक माहिती महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या (मास्को) www.mescoltd.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत 7588624043 व 9168986864 या क्रमांकावर साधता येऊ शकेल. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी