आदर्श ग्रामसाठी सर्व विभागांनी एकत्रितरित्या कार्य करावे
-जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*गावाचा आराखडा तयार करावा
*योजनांमध्ये आदर्शग्रामला प्राधान्य द्या
यवतमाळ, दि. 10 : राज्यपाल, खासदार आणि आमदार आदर्शग्राम योजना ही अत्यंत चांगल्या हेतूने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी निवडलेली गावे सर्व सोयींनी युक्त करताना सर्व विभागांनी एकत्रितरित्या या गावांना प्राधान्यावर ठेऊन विकासात्मक कामे राबवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. आदर्श ग्राम योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. राठोड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात आदर्शग्रामसाठी 12 गावे लोकप्रतिनिधींनी निवडली आहे. या गावात शासनाच्या योजना पोहोचविण्यासोबतच या गावातील नागरीकांचे राहणीमान, आचार विचारात बदल घडवून आणावयाचा आहे. प्रामुख्याने गावात आधार नोंदणी, मध्यान्ह भोजन, कुपोषित बालकांची श्रेणीवाढ, आरोग्याचा सुविधा आदींसोबतच अंगणवाडी, वाचनालय, आरोग्य केंद्र या भौतिक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा लागणार आहे. या गावाच्या विकासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष अधिकाऱ्यांनी गावाचा एकत्रित आराखडा तयार करून तो लोकप्रतिनिधींच्या मान्यतेने नियोजन विभागाकडे सादर करावा. यातील ज्या सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाणे शक्य असेल, त्याला नियोजन विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा.
सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा ह्या गावाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आधार नोंदणीसाठी पुढाकार घेऊन संपूर्ण नोंदणी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावात आरोग्य शिबिर आयोजित करून दुर्धर आणि असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्यांना उपचार देण्याची व्यवस्था करावी, जनधन योजनेंतर्गत प्रामुख्याने महिलांची खाती उघडण्यासाठी प्रयत्न करावा, मातीचे नमूने तपासावेत, तसेच जिल्हा परिषदेने आपल्या प्रत्येक योजनेत या गावांना प्राधान्य क्रमाने घेऊन शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी