प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी निवड, निकषात बदल
यवतमाळ, दि. 18 : केंद्र शासनाने सन 2016-17 पासून इंदिरा आवास योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे केले आहे. तसेच अंमलबजावणीच्या स्वरूपात लाभार्थी निवडीचे निकष, अनुदान नाव आदींमध्ये सुध्दा बदल केला आहे.
या योजनेतील अनुदानाच्या अंतर्गत लाभार्थीला 95 हजार ऐवजी 1 लाख 20 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थी निवडीसाठी सन 2015-16 पर्यंत सन 2002च्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा वापर करण्यात येत होता. परंतु सन 2016-17 पासून सामाजिक आर्थिक व जात गणना 2011 च्या सर्वेक्षणामधून घरकुलासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थीची यादी (GENERATED PRIORITY LIST) केंद्र शासनाने www.iay.nic.in या वेबसाईवर उपलब्ध करून दिली आहे. या याद्या पंचायत समिती मार्फत संबंधित ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या याद्या ग्रामपंचायती, ग्रामसभेसमोर प्रसिद्ध करण्यात करीता, तसेच या यादीबाबत नागरिकांचे काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कालबद्ध कार्यक्रम जिल्हा परिषदस्तरावरून ठरवून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त याद्यांचे ग्रामसभेमध्ये वाचन करून याद्यामधील अपात्र कुटुंबांची नावे वगळणे, पात्र कुटुंबांची नावे समाविष्ठ करणे याबाबत ग्रामसभेमध्ये प्रत्यक्ष निर्णय घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या सर्व ग्रामसभाकरीता पंचायत समितीस्तरावरून पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त यादीच्या संदर्भात किंवा ग्रामसभेने मंजूर केलेल्या याद्यांच्या संदर्भात नागरिकांच्या काही आक्षेप, हरकती असल्यास त्यांनी आपले आक्षेप पंचायत समितीकडे सादर करावयाचे आहेत. पंचायत समितीस्तरावर प्राप्त हरकती, दावे निकाली काढण्याकरीता  गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरीय समितीने दिलेल्या निर्णयांवर किंवा अंतिम निर्णय घेण्याकरीता जिल्हा परिषदस्तरावर मुख्य कार्यकारी अधिकरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अपिलीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
भविष्यातील घरकुल योजनांसाठी ही यादी वापरली जाणार असल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी  ग्रामसभेमध्ये  लाभार्थ्यांची निवड होईल, तसेच कोणी वगळले गेले असल्यास त्यांचा यादीमध्ये समावेश करून घेण्यासाठी विहित वेळेत तालुकास्तरीय समितीकडे आपला आक्षेप, दावा, हरकत, अपील, तक्रार द्यावी, याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, यवतमाळ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

00000

Comments

  1. Sir maza gavamadhe ya yojnechi anmalbajavani khupch slowly hot ahe.2 years zalet ajun konachech Ghar purn nahi zalet.ashane bakichyani kadhi changlya gharat rahaych.tyancha no.aieparyant tr tyanchi deat hovun jail.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी