खाजगी अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे
दिनांक 30, 31 ऑगस्ट रोजी समायोजन
यवतमाळ, दि.24 : खाजगी अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे 30 आणि 31 ऑगस्ट रोजी समायोजन करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे. खाजगी अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहितीedustaff.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भरलेली आहे. त्यानुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरले त्यांची यापुर्वी मुख्याध्यापक, संस्थाप्रतिनिधी संबंधीत शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार शाळास्तरावर/संस्थास्तरावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची निश्चिती करून देण्यात आली. दिनांक 24 ऑगस्ट त्या संबंधीत डाटा फायनालाईज करून शिक्षणाधिकरी (माध्य), जिल्हा परिषद, यवतमाळ कार्यालयात अतिरिक्त ठरणाऱ्या व रिक्त पदांची यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार संबंधीत यादीत काही त्रुटी असल्यास आणखी आक्षेप असल्यास संबंधीतांनी आक्षेप दिनांक 27 ऑगस्ट पर्यंत शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद, यवतमाळ कार्यालयात सायं 5 वाजेपर्यंत सादर करावे. संबंधीतांची हरकतीवर दिनांक 28 ऑगस्ट ला पुनश्च सुनावणी घेवून अंतीम डाटा फायनालाईज करून प्रमाणपत्र 2 अपलोड करण्यात येणार नाही. त्यानंतर दिनांक 30 व 31 ऑगस्ट ला अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन ऑनलाईन करण्यात येणार आहे. तेव्हा संबंधीत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी दिनांक 30 व 31 ऑगस्ट 2016 ला शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद, यवतमाळ कार्यालयात समायोजनासाठी नियुक्ती आदेशाची प्रत, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्रतीसह तसेच आवश्यक दस्तऐवजासह सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता या कायालवधीत उपस्थित राहावे.
तसेच ज्या शाळांत रिक्त पदे आहे त्या शाळांची  यादी सुध्दा शिक्षणाधिकारी (माध्य), जि.प.यवतमाळ यांचे कार्यालय दिनांक 24 ऑगस्ट ला प्रकाशित केलेली आहे. त्या यादीत बिंदुनामावली नुसार रिक्त  पदे दर्शविली काय. दर्शविण्यात आलेले विषय बरोबर आहेत काय. याची पडताळणी संबंधीत मुख्याध्यापक/संस्थाचालक यांनी खात्री करून घ्यावी. त्यात काही बदल असल्यास दिनांक 27 ऑगस्ट ला सायं 5 वाजेपर्यंत लेखी त्रुटी कळविण्यात यावी. सदर त्रुटीची दुरुस्ती 28 ऑगस्ट ला करण्यात येणार आहे. तेव्हा समायोजनाच्या दिवशी ज्या शाळेत रिक्त पदे आहेत. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी/संस्थाचालकांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे. तेव्हा अतिरिक्त ठरणारे शिक्षक, रिक्त पद असणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक/संस्थाचालक यांनी शिक्षकांचे समायोजनाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी