वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी घ्यावी
*परवानगीसाठी ऑनलाईन सुविधा
यवतमाळ, दि. 10 : जिल्ह्यातील गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव आणि इतर उत्सव साजरे करु इच्छिणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून परवानगी घेवूनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार कलम 41 क नुसार वर्गणी गोळा करण्याची परवानगी ही ऑनलाईन प्राप्त करून घ्यावी, परवागनी मिळविण्यासाठी ऑनलाईन अज charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामधील 41 सी इव्हेंटमध्ये माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.
00000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी