ऑगस्ट महिन्याचे अन्नधान्याचे परिमाण व दर जाहिर
यवतमाळ, दि. 10 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करावयाचे ऑगस्ट महिन्याचे अन्नधान्याचे दर व परिमाण जाहिर करण्यात आले आहे. निर्धारीत दर व परिमाणानुसार वितरण करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना केल्या आहेत.
            कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेले गहू, तांदुळ, साखर, केरोसीनचा यात समावेश आहे. बीपीएल, अंत्योदय योजना, अन्नपूर्णा योजना, एपीएल तसेच कल्याणकारी संस्था व वसतीगृहांसाठीच्या दरांचा यात समावेश आहे. शिधा पत्रिकाधारकांना देय असलेल्या प्रमाणात तातडीने या वस्तूंचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ज्या व्यक्तींनी धान्याची उचल केली नसेल त्यांना पुढील महिन्यात धान्य वाटप करावयाचे आहे. धान्यवाटप चुकीच्या पद्धतीने होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी