यवतमाळ, दि. 25 : प्रेरणा प्रकल्प, राष्ट्रीय
तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालय, यवतमाळ यांच्यातर्फे
बाभुळगाव येथील ग्रामीण रूग्णालयात जागतिक अवयवदान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ठाकरे, वैद्यकीय अधिकारी श्री.
पोहे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अशोक गुप्ता, प्रेरणा प्रकल्पाचे वैद्यकीय
अधिकारी डॉ. केशवाणी, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ सरफराज सौदागर, श्रीमती दळवी आदी
उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री. सौदागर यांनी अवयवदानाचे महत्त्व समाजवून
सांगितले. मनुष्य जिवंत असताना रक्त, मुत्रपिंड, यकृताचा तुकडा, स्वादूपिंडाचा तुकडा,
बोन मेरो तर मृत्यूनंतर डोळे, त्वचा, हाडे, स्नायू बंध, काटीलेज, रक्तवाहिन्या, मध्य
कानातील हाडे दान करू शकत असल्याचे सांगितले. डॉ. केशवानी यांनी मस्तिस्क स्तंभ मृत्यूबद्दल
विविध अवयव दान करू शकत असल्याची माहिती दिली. डॉ. ठाकरे यांनी त्वचादानाचे महत्त्व
समजावून सांगितले. त्वचा ही जखमांना जंतुसंसर्गापासून वाचविते, वेदना कमी करते आणि
शरीराचे तापमान राखण्यास मदत करते, मृताची त्वचा कशाप्रकारे जीवनदायी कार्य करीत असल्याचे
त्यांनी समजावून सांगितले. तसेच अवयवदानामुळे अनेक लोकांना जीवनदान मिळू शकते, याबाबत
सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी मार्गदर्शन
केले. प्रिया इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक
मोहित पोहेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी किरण दिघडे, रेखा पिंपळकर यांनी सहकार्य
केले.
00000
Comments
Post a Comment